महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे,
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर
स्कूल कनेक्ट प्रोग्राम अंतर्गत
तालुकास्तरीय निबंध स्पर्धा
प्रति,
मा. मुख्याध्यापक / प्राचार्य
-----------------------
-----------------------
-------------------
पुरोगामी विचारांचा वसा घेऊन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची स्थापना ३ राज्यांच्या सीमेवर वसलेल्या उदगीर येथे १९६२ साली झाली. या महाविद्यालयाने सुरुवातीपासूनच केवळ पाठ्यपुस्तकीय शिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वादविवाद मंडळाच्या माध्यमातून अनेक ज्वलंत प्रश्नांवरती विद्यार्थ्यांची मने प्रज्वलित करण्याचे काम महाविद्यालयाने केले. जातीय, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याच्या दृष्टीने विविध महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त व्याख्यानांचे आयोजन सातत्यपूर्ण करण्यात उदयगिरी महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. याचा परिणाम असा झाला की, विद्यार्थ्यांमध्ये सम्यक दृष्टी निर्माण झाली. सामाजिक जाणीवा तरुणाईमध्ये समृद्ध झाल्या. एकांगी विचार करण्यापेक्षा समग्र विचार करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागला. त्यामुळेच अनेक 'सामाजिक चळवळीचे केंद्र' म्हणून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय ओळखले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून १५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी आपल्या शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा दिनांक ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत आपापल्या स्तरावर घेऊन त्यातील सर्वोत्कृष्ट तीन विद्यार्थ्यांचे निबंध दिनांक १० ऑगस्ट २०२५ पर्यंत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे पाठवावेत.
निबंध स्पर्धेचा विषय -
माझ्या स्वप्नातील भारत ( कनिष्ठ गट - आठवी ते बारावी )
महापुरुषांच्या स्वप्नातील भारत आणि सद्यस्थिती ( वरिष्ठ गट पदवी ते पदव्युत्तर )
निबंध लेखनाचे माध्यम - मराठी भाषा
शब्दमर्यादा : १५०० ते २००० शब्द
स्पर्धेची बक्षिसे :
प्रथम - ५००० रुपये
द्वितीय ३००० रुपये
तृतीय २००० रुपये
प्रोत्साहन पर ५ बक्षिसे प्रत्येकी ५०० रुपये व प्रमाणपत्र...
शाळा-महाविद्यालयातून सर्वोत्तम ठरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
टीप : परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
संपर्कासाठी :
निबंध स्पर्धा समन्वयक - प्रा. डॉ. गौरव गोविंदराव जेवळीकर ( वरिष्ठ गट ) ९८५०५९०९३४
प्रा. प्रवीण प्रभाकरराव जाहुरे ( कनिष्ठ गट ) ९४२१०९६६५९
प्राचार्य
डॉ. राजकुमार मस्के |